ही थंडी मुळात चालू होते तीच सकाळ मुळे. सकाळ मध्ये पहिल्या पानावर १ फोटो येतो. या बातमीचे आणि फोटोचे शीर्षक असते “पुण्यात गुलाबी थंडीचे आगमन“ त्या फोटोत १ झाडांमधून जाणारा रस्ता असतो, त्या रस्त्यावरून १ सायकलस्वार चाललेला असतो. त्याच्या शेजारून १ आजोबा स्टाईलची व्यक्ती कानटोपी घालून चाललेली असते. आणि नुकताच सूर्योदय झाला असल्याने या फोटो मध्ये अशी सूर्याची किरणे त्या घनदाट झाडातून रस्त्यावर डोकावत असतात. रस्त्यात थोडेसे धुके पण असते. सो फोटोची एकून रंगसंगती, आणि त्यातली पात्रे योग्य परिणाम साधतात. आणि एकदाची पुणेरी गुलाबी थंडी पडते.
पुण्यात खरोखर थंडी पडली असे म्हणायला हरकत नाही.
डिसेंबर 14, 2010 by सुदर्शन
खरच कितीही थंडी वाजत जरी असली तरी जो पर्यंत सकाळ मध्ये लोक लक्ष्मी रस्त्यावर नेपाळी लोकांकडे खरेदीसाठी गर्दी करत आहेत असा फोटो येत नाही तोपर्यंत म्हणावी तशी थंडी पडलेलीच नसते. किंवा पडूच शकत नाही. आता मला काय कोणालाच माहित नसणार की या लोकांना नेपाळी का म्हणतात. कोणीही विचारलेला नसणारे. ते भारताच्या पूर्वोत्तर राज्यांमधले पण असू शकतात. असो.
लोक भारानियामातून सुटका म्हणून खुश, लक्ष्मी रस्त्यावरचे विक्रेते त्यांच्या शॉपिंग फेस्टिवलची सुरवात म्हणून खुश. दुकानांमधून गरम कपड्यांचे सेल लागतात. टीव्ही वर च्यवनप्राषच्या जाहिराती येवू लागतात. साठ साल के बुढे या साठ साल के जवान अजून अजून बर्याच.
मागच्या वर्षीचे स्वेटर, काश्मिरी शाली, कानटोप्या, हातमोजे सगळं कपाटांमधून पटापट बाहेर येतात. लोक सकाळी टेकड्यांवर गर्दी करू लागतात. आणि अजून कित्तीतरी.
पुण्यापासून दूर आल्यापासून या सगळ्याच गोष्टींची कमतरता अशी विचार करूनच भरून काढावी लागते.