Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for मे, 2009


उकडीच्या मोदकांचा घाट

काही दिवसांपूर्वी अंगारकी चतुर्थीला मित्रासोबत बोलत असताना मला तो चिडवत होता की तो उकडीचे मोदक खात आहे,मस्त झाले आहेत आणि काय काय…. मी म्हणालो मी पण करून खाईन मोदक त्यात काय आलं मोठंसं? असं म्हणता म्हणता मी मोदक करून दाखवायचं challenge घेतलं.

ukadiche modak

ukadiche modak

आता प्रश्न होता तांदुळाची पिठी, खवलेला नारळ अमेरिकेत कुठून मिळणार? मला जवळचं भारतीय  सामानाचं दुकान तब्बल ९० मैलावर आहे. एका मित्राला सांगितल्या या गोष्टी आणायला. न विसरता तो पिठी घेवून आला पण खवलेला नारळ विसरला. मग काय? walmart मधून नारळ आणला. आता पुढचा प्रश्न होता तो फोडणार कसा? कोयता नाही, खाली कुठे दगड पण मिळेना. म्हणून शेवटी चक्क टेबल स्पून नि हाणून हाणून फोडला तो नारळ.

तो चमचा जरा भक्कम होता नाहीतर तोच फुटला असता. एक वेळ अशी आली होती कि नारळ फुटायचं नावच घेईना. तरी न कंटाळता चमच्याचे घणाघाती वार करत होतो नारळावर. खूप वेळानी नारळालाच कंटाळा आला आणि तो एकदाचा फुटला. मग त्या नारळाची करवंटी कम कवटी कशी वेगळी केली माझं मलाच ठाऊक. अजूनही मोदक करायचा बेत पक्का होता माझा.
मग चीजच्या किसणीवर नारळ किसला. झाला नारळ तर तयार झाला. मग १ फटक्यात पुरण तयार केला. गूळ, बदाम,पिस्ते,वेलची,केशर घालून सारण पूर्ण केलं. असं मस्त सुगंध दरवळत होता म्हणून सांगू. मग यथावकाश शिजवलेल्या तांदुळाच्या पिठीच्या पाऱ्या करून त्यात ते सारण भरून अशा मस्त कळ्या पाडल्या मोदकाला आणि मोदक तयार…. अक्षरशः २ तासात केले मोदक. खूपच सही वाटला कामगिरीवर…

Read Full Post »


आज एक कवडी मात्र संबंध नसलेली ३ तासांची मीटिंग cum presentation मध्ये जावे लागणार होते. अत्यंत बोअर होणारे माहित होतं पण काही इलाज नव्हता जाण्याशिवाय.मलाच कळत नव्हता मी काय करणारे मिटिंग मध्ये.

मिटिंग ची वेळ झाली, मी जागचा हलेना म्हणून मित्रं बोलवायला आला. खरातर याचं पण काही काम नव्हतं एकाला एक असे आम्ही निघालो. आत मध्ये वेळ घालवायला म्हणून पाण्याची बाटली, कप भरून चहा, वही, पेन अशा जामानिम्यात निघालो.

मिटिंग रूम मध्ये शिरलो तर अशी मस्त [झोपायची] वातावरण निर्मिती झाली होती. लंब वर्तुळाकार टेबल, मऊ मऊ खुर्चा, मंद दिवे, बंद खिडक्या,थंड हवा त्यात नुकतच जेवण झालेलं. मनात आलं एक मस्त रजई असती तर? आहा हा हा…. माझ्याहून सुखी कोणी नसते.

१० मि. मध्ये मिटिंग चालू झाली. चहा होता तोवर मि निर्धास्त होतो. पण लौकरच चहा संपला आणि अक्षरशः दहाव्व्या मिनिटाला पहिली जांभई आली. आणि मी चालू झालो होतो. presentation देणाऱ्या बाई थांबायचं नाव घेईनात. इकडे मी पेंगू लागलो. किती वेळ गेला माहित नाही पण टेबलाखालून समोरच्या मित्रांनी लाथ मारली आणि मी खडबडून जागा झालो. मग पुढचा १ तास काही न काही करून झोप हटवण्याचा प्रयत्न केला. कसा केला ?

तो खालीलप्रमाणे. १ २ वेळा स्वतःलाच चिमटे काढले. मग पेन लांब टाकले जेणे करून ते घ्यायला गेल्यावर झोप जाईल. ३ ४ वेळा खोकलो. आणि मग असे काही झालं की माझी झोप पार उडाली.

माझ्या शेजारी १ सिनियर बसले होते. ते पण पेंगत होते. आणि मला वाटते ते माझ्या पेक्षा टेरिफिक पेंगत होते. मी १ २ वेळा घोरण्याचा आवाज पण ऐकला. शेजारीच होते ना. समोर बसलेल्या मित्राला हळूच पायांनी इशारा करून शेजारी बघ म्हणून सांगितले. तो हसायला लागला बघून मला पण हसू आवरेना.हसू फुटून फुटून किती फुटावे. तोंड दाबून हसत होतो. आता मस्त वेळ जात होता. तिकडे त्या बाई जाऊन दुसरे १ जण कधी चालू झाले मलाच नाही माहिती. आणि मग टाळ्या वाजल्या आणि शेजारचे उठले. मग प्रश्नोत्तर चालू झाली. सिनियरनी १ प्रश्न विचारला. पूर्ण वेळ झोपले होते. तर असा गंभीर प्रश्न कसा विचारला? मला कळेना. कान उघडे ठेवून पेंगत असावेत [म्हणजे हत्तीच्या कानासारखी उघडझाप नव्हे? पण झोपेत पण लक्ष्य देत होते अस.] यथावकाश कार्यक्रम संपला आणि मी सुटलो.

मला सांगा तुम्ही अशी कंटाळवाण्या मिटिंग मध्ये आलेली झोप घालवता कशी?

Read Full Post »


मी ज्या टीम लीडर्स ला पाहिलंय त्यांच्या विषयी थोडसं.खरतर लिहावं तितकं कमी आहे हे मला माहित आहे. तरीपण……

टीम लीडर्स म्हणजे सध्याच्या आईटी कंपनीमध्ये असणारे पीएम  च्या हाताखाली थोडी माणसे सांभाळत असतात.
जर एखाद्या कानडी च्या मास्तरला मराठीचा शिक्षक नेमावा असे ते वागतात. ज्या विषयात आजूबाजूला काम चालू असतं त्या टेक्नोलोजि बद्दल त्याला ओ की ठो माहीत नसतं. कधी काम पण केला असत की नाही माहित नाही. पण त्यात काम करणाऱ्याला त्याला कळू द्यायचा नसतं कि त्याला काहीच माहित नाही. मग त्याची रोज सारखी त्रेधतिर्पीट उडते.
client call  च्या वेळी तर धमाल येते. भम्भेरी उडालेली असते. काय बोलावे तरी अडचण नाही बोलावे तरी …. मग काही तरी करून वेळ मारून न्यायची. संध्याकाळी ५ वाजता याचा काम चालू होता. प्रत्येकाकडे जाऊन विचारणार,झाला कारे बाबा दिलेला काम? मग असा म्हणणार Make sure you complete your task before going home…
आणि सगळ्यांना बाय करून ५:३० ला हा घरी. दिवसभर काम काय तर काहीतरी टायपिंग करायचे, e-mails  पाठवायच्या, ३/४ वेळा चहा, तासभर जेवण म्हणजे यो धमाल करायची आणि ५:३० ला घरी म्हणजे सोने पे सुहागा ….. एक वर्षा दीड वर्ष असा करून बढती मिळवायची आणि चालू परत..  कधी कधी वाटतं आपण काम करतो ते चुकता का? बोल बच्चनगिरी जमत नाही ना..  शोधतोय कुठे क्लास आहे का……
एकदा काय झाला एक काकू आमच्या टीम लीडर होत्या. जेवणानंतर त्या laptop वर [solitare] पत्ते खेळायच्या. ते पण सर्वांची नजर चुकवून. मी आणि मित्र काहीतरी विचारण्यासाठी त्यांच्या कॅबीनमध्ये टेबलाजवळ गेलो. त्यांचा डाव रंगला होता त्यामुळे त्यांना आमची चाहूल लागली नाही आणि त्यांना कळेपर्यंत आम्ही त्या laptop पाशी गेलो. गेलो तर काय …. त्यांची पळापळ झाली, पत्त्याचा गेम बंदच होईना.एका हातानी घाईघाईत मौस [mouse] वापरता येईना. दोन्ही हात लावले तरी गेम बंद होईना. आम्ही तर जवळ उभे, मग त्यांनी सरळ लपटोपच खाडकन बंद केला. आम्हाला बोलल्या अरे काही नाही असंच जरा कामात होते. आम्हाला जाम हसू येत होते पण हसता येईना.आम्ही हाताच्या मुठी घट्ट बंद करून तेथे कसे बसे उभे होतो. वाटत होते त्यांना म्हणावे चालता हो कधी कधी चुकून पकडले जातो आपण, त्यात इतका खजील कशाला व्हायचं?

आमचा काम झाल्यावर आम्ही तिथून जी धूम ठोकली ते सरळ खालीच गेलो. हातातल्या पुस्तकांसकट आम्ही पार्किंग मध्ये जाऊन वेड्या सारखे हसत होतो. खाली लोळायचे बाकी होतो. येणारे जाणारे आम्हाला बघून हसायला लागले. परत ऑफिस मध्ये येऊन बसलो १० मिनिटे झाली मित्रांनी माझ्या कडे बघितला तरी मला परत हसायचे attack येवू लागले.
दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या कॅबीन चे दार गेम च्या वेळी बंद असायचं. कळत ना कोणी आल तर….

Read Full Post »


जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की ऑफिस मध्ये तुमच्या समोर, शेजारी,आसपास बसणारी बाई / मुलगी काम करते का?
आता या प्रश्नाला कोणात्याही स्त्रीने आक्षेपार्ह मानू नये.सगळ्याच स्त्रियांबद्दल मी बोलत नाहीये. त्या विशिष्ठ स्त्रियांबद्दल बोलतोय.आता कर्म धर्म संयोगाने तुम्ही त्यात मोडत असाल तर सॉरी…

मी फक्त आजवर पाहिलेली परीक्षणे नोंदवत आहे. समजा शेजारी अविवाहित पण नुकतेच लग्नं ठरत आलेली मुलगी असेल तर कामाचे १२ वाजले असं समजा… कारण हु आणि चू झाले कि त्यांना फोन. कुजबुज चालू,१० मिनिटे जागेवर बसून कुजबुज चालते. मग बाईसाहेब वरांड्यात, बाल्कनी मध्ये जाऊन भिंतीलचा टेकू घेवून त्या फोन च्या आत जाऊन बोलतात. मग इतका बोलून चहा लागतो. मग मैत्रिणींना त्यांचे किस्से सांगणार, मग मधेच तुळशीबाग, नवे ड्रेस मटेरीअल, कानातले, नाकातले काय विचारू नका. मधूनच तिची आई फोन करते.मग तिला सगळा अपडेट. आणि एवढं करून ऑफिस मध्ये उशिरा थांबायची तयारी नाही. मुलगी ना…. मग टीम लीडर ला मस्का चस्का झाला कि काय…. आहोत आम्ही सदैव हजर… आणि तो टीम लीडर पण कमाल आहे. तयारच असतो ५ च्या आसपास मस्का लावून घ्यायला. वाटते कि असा तडक जाऊन त्याच्या कानाखाली जाळ काढावा.

हि अशी मैत्रीण परवडली पण एखादी काकू शेजारी असेल तर संपूर्ण दिवसाचा बट्ट्या वाजतो. काकूंचा लग्नं जुनं झालेला असतं म्हणून विषयही असे मुरलेले असतात. जसे कामवाल्या बाई च्या दांड्या, काल रात्री केलेला जेवणाचा मेनू, सासूबाई आई शप्पथ या सासूबाई का अशा वागतात त्याचा त्रास आम्हाला होतो…. अजून आहेत ना फोन चे विषय झाले नाहीयेत.साडी साठी केलेली वणवण, त्यावर ह्यांची प्रतिक्रिया, कधी कधी मराठी मालिके मध्ये काय चाललाय हे पण चर्चिले जाते. आणि महत्वाचा म्हणजे काकू हे सगळा स्वतःच्या फोन वरून बोलत नाहीत, ऑफिस चा फोन वापरतात. जहागीर उतू जात असते ऑफिसची. हे एक दिवसाचा नाहीये रोजचा आहे. आणि बोलताना आवाज तर काय? फोन न लावता बोलल्या तरी पलीकडे ऐकू जाईल. त्या काकू पण आम्हाला वरिष्ठ आहेत मग आम्हाला सगळा ऐकून घ्यावं लागतं. एक दोनदा तो फोन उचलून माझ्या टेबल वर ठेवला आणि उगाचच बिझी दाखवला.अगदी कसं कसं होत होते त्यांना. मलाच नाही बघवली ती तडफड.

पण एखादी काकू / मैत्रीण जवळ बसायलाच हवी. खरच हवी. जरा दुपारचे ४ वाजायचा अवकाश ह्यांच्या पर्स मधून छोटे छोटे डबे निघू लागतात. आणि आईशप्पथ त्या डब्यांमध्ये असं मस्त मस्त काय काय असतं. चिवडा , शंकरपाळे अजून काय काय असतं. त्यांचा सय्यम आहे कि सकाळपासून तो डबा आणून ४ वाजता उघडायचा.आणि मग हा एक डबा अजून ४ तसे डबे गोळा करतो.

Read Full Post »


काल असाच सूर्यास्ताच्या सुमारास रस्त्यातून जात असताना आकाशात लक्ष्य गेलं. जो नजारा होता तो बघून मी अवाक झालो.

सूर्य मावळायला १० मिनिटे बाकी असावीत, सर्व ढग एका बाजूला जमा झाले होते, असे वाटत होते की सगळे ढग सूर्याला निरोप द्यायला जमा झाले आहेत.

Suryasta

Suryasta

सर्व ढगांनी वेगवेगळे रंग धारण केले होते. काही शुभ्र पांढरे होते ते एकदम मागे होते, घरातले आजोबा असतात ना एकदम मागे उभे राहून अभिमानाने आपल्याकडे बघत असतात. काही असे फिक्कट गुलाबी होते जणू काही एखादी गुलाबाची कळी गालात लाजत लाजत आच्छा करते आहे. काही असे पांढऱ्या ढगांचे पुंजके उगीचच इकडून तिकडे उडत होते. छोटी मुलं असतात ना आपण निघालो की टाटा करत अशी पुढे पुढे येत असतात आपल्या मागे. आणि सूर्य काही ढगांच्या गर्दीतून हलकेच दर्शन देत होता.

आज हे सर्व बघून सूर्याला पण वाटलं असेल आज जरा वेळ अजून थांबू का? पण बघता बघता सूर्य….

पण तो जाताना त्या सर्वांना सांगून गेला असेल की मी जात नाहीये काही जरा वेळानी परत येतोय.

Read Full Post »

Older Posts »