Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जून, 2009


या सायबर क्राइमच्या युगात इंटरनेट वर लपून राहणे हे केवळ अशक्य बनले आहे. या संदर्भातली महेंद्र काकांची खालील पोस्ट वाचून जे काय काय आठवले ते म्हणला टाकावं ब्लॉग वर.

तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?
या वरून पुण्यात घडलेली १ घटना आठवली.

एक मुलगा ओर्कुट वर खोटे प्रोफाईल करून एका मुलीला त्रास देत होता.तिनी आधी या गोष्टीकडे कानाडोळा केला पण जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा मात्र तिनी पोलिसांमध्ये आणि सायबर सेल कडे तक्रार नोंदवली. त्यला पकडायला थोडा वेळ लागला पण तो पकडला  गेला.
आपण इंटरनेट वर जे काही करत असतो त्याची नोंद आपल्या ISP [Internet Service Provider] कडे होत असते. म्हणजे कोणकोणत्या sites पहिल्या, कुठे कुठे click केलं इत्यादी  इत्यादी…… लोकांना वाटता कि browser ची History रिकामी केली कि झाला. पण नाही  🙂  हे म्हणजे मांजराने डोळे मिटून दुध पिण्या सारखे झाले.
आपण जेव्हा कोणाला इमेल पाठवतो तेव्हा त्या इमेल सोबत आपण आपली बित्तम बातमी पण पाठवत असतो.हि सगळी माहिती इमेल हेडर मधून जात असते. हि माहिती म्हणजे तुमचा ISP कोण आहे, कोणता टाइम झोन, देश, IP address [ IP address  म्हणजे आपण इंटरनेट वर log in  झालो की आपल्या कॉम्पुटर ला एक unique नंबर मिळतो ] इत्यादी

या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण हे yahoo mail मध्ये पाहू शकतो.

yahoo

तसेच Microsoft Outlook Express मध्ये सुद्धा हि सोय आहे. Outlook मध्ये मेल उघडल्यावर view -> Options असे क्लिक करून पडताळणी करू शकतो. यासारखी सोय  बाकी mail providers मध्ये असेल तर मला कल्पना नाही. आपणास माहित असल्यास जरूर कळवावे.

अमेरिकेत ह्या सायबर क्राईम चा विषाणू खूप पसरलेला.आहे. इथे घडणारा १ common प्रकार म्हणजे Identity theft. या मध्ये इथले सायबर भुरटे, भुरटे कसले दरोडेखोरच इंटरनेट वरून एखाद्याची सर्व गुप्त माहिती जमा करतात आणि त्याची बँक खाती, क्रेडीट कार्ड सगळं इंटरनेट वरून बळकावतात.  नेहमी ऑनलाईन शॉपिंग करताना खबरदारी घ्यावी लागते. आणि इकडे सर्व व्यवहार तर ऑनलाईनच होत असतात. म्हणून डील करताना त्या पोर्टल बद्दल गुगलिंग करून थोडी माहिती मिळवावी आणि मगच खरेदी करावी.
भारतात तरी अजून हे पोचला नाहीये. यायला वेळ लागणार नाही. कायम काळजी घेतलेली बरी. कायम बँकेची कागदपत्रे, मोबैईल ची बिले, इतर कागद अगदी चिटोरे चिटोरे करून फेकायचे. कोणाला ते कागद वाचून आपल्याबद्दल माहिती मिळायला नको. असे टपलेले कमी नसतात.

पण आपल्या इथे ऑनलाईन शॉपिंग अजून तरी इतके प्रसिद्ध नाहीये. कारण आपण खरच खात्री देवू शकत नाही कि घेतलेली वस्तू चांगली असेल ना, खराब असेल तर परत कशी करणार आणि मुख्य म्हणजे खरेदीची मजा येत नाही, ४ दुकाने फिरून पायपीट केल्याशिवाय खरेदी झाली असा वाटत नाही.

असो  मध्यंतरीच वाचनात आले कि महाराष्ट्र पोलीस सायबर सेल कडे जास्त लक्ष्य देत आहेत आणि त्यांचे हात अधिक मजबूत करणार आहेत. वेळे आधी जागे झाले म्हणायचे.

Read Full Post »


स्टेफी माझ्या सोबत ऑफिस मध्ये काम करते. सगळ्यांच्यात ती खूप सही आणि मनमिळावू म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याचे झाले असे काल तिचा वाढदिवस होता, त्यामुळे स्वारी मस्त नटून थाटून आली होती. अधिक म्हणायचं तर एकदम कडक मध्ये आली होती. येताना तिनी आमच्या सर्वांसाठी खूप प्रकारचे केक आणले होते. सोबत चोक्लेट्स पण होती. शिवाय डोनट पण होते रंगीबिरंगी icing मध्ये लपलेले. मग सर्वांना तिनी बोलावून आस्वाद घेण्यास सांगितले. आता मी जर पुण्यातल्या ऑफिस मध्ये असतो तर हा सगळा माल मसाला काही मिली सेकंद मध्ये गट्टम झाला असता पण इथे सगळे हळू हळू, sofasticated अवतारात तिला शुभेच्छा देवून खाऊ खात होते. बर ही खाद्य यात्रा बास झाली. महत्वाचे तर पुढे आहे.

तर सगळे तिच्या डेस्क भोवती होते एवढ्यात २ सहकारी १ भलामोठा पुष्पगुच्छ घेवून आले. तिनी तो स्वीकारला आणि त्यावरीन संदेश वाचला तर त्यात लिहिला होता from Love. सर्वांना वाटले असेल नवर्यानी पाठवलेला. १० मिनिटे होतात तोवर ६ फुट उंच ग्रीटिंग कार्ड आले. परत ते from Love. ती लाजून लालेलाल झाली होती. अजून ५ मिनिटांमध्ये १ मोठठा चोक्लेट्स चा box आला तो पण Love कडून. जरी अति होत होते. आणि तितक्यात साक्षात तो तिचा Love का कोण आला. मग दोघांचे हस्तालोन्दन झाले. अमेरिकी तर्हेने ग्रीटिंग झाले. म्हणालं चला आता कामाला लागुया. इतक्यात एक मित्र बोलला अरे हा तर तिचा नवरा नाहीये. मी म्हणालो काय? म्हणालो गप तुला काय माहित? तर तो बोलला कि तो मागच्या वर्षी तिच्या घरी पार्टी ला गेला होता तेव्हा भेट झाली होती.

मग आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला. म्हणल असेल बाबा काहीतर गम्मत दोघांची.आपल्याला काय करायचय असेनात का. पण मला राहून राहून वाटत होते या वयात? म्हणजे आज स्टेफी चा ५२ वा वाढदिवस होता. आणि हा जो कोणी Love  होता तो तिचा बॉयफ्रेंड होता. म्हणलं अरेय वाह मज्जा आहे.

आपल्याला पुण्या मुंबईत काय भारतात पण असा पहायची सवय नाही म्हणून मला जरा अप्रूप वाटलं बाकी काही नाही.

Read Full Post »


सगळ्या शाळांचा पहिला दिवस पार पडला असेल. मला पण माझे शालेय जीवनातील पहिले दिवस आठवले.
मला अगदी नको वाटायचा तो पहिला दिवस. तोच दिवस असं नाही साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शाळेचे वेध लागायचे. अगदी नको नको व्हायचे.मग भाऊ चिडवायचा “आता शाळा” हे एव्हढं बोलून सुध्धा पोटात धस्स व्हायचे.

का कुणास ठावूक उगाचच भीती वाटायची. कोण असतील नवे शिक्षक? मित्र काय तेच असणार होते ते तरी बरे होते. मग नवीन विषय, नवा अभ्यास असा ब्रह्मराक्षस दिसायचा समोर. मला अभ्यास बिलकुल आवडायचा नाही. मी प्राथमिक शाळेत असताना कोणीतरी सांगितला होतं कि जसा जसा मोठा होशील तसतसा अभ्यास कमी होत जाईल. हे ऐकून मुख्यतः मी शाळेत जायला तयार झालो होतो. पण कसलं काय?

कित्ती वर्ष बाबच पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे.नव्या वहीत कायम उजवीकडच्या पानावर लिहायला आवडायचे. कारण उजवीकडचा पान उलटलं कि त्या डावीकडच्या पानाखाली तो पुठ्ठा येतो ना, मग अक्षर नीट येत नाही. वहीच्या शेवटच्या पानावर कायम अश्या गिरगोट्या मारलेल्या असायचा. मग ते पान भरला कि असा उलटे येत येत ५/६ पाने गिरगोट्याच  असायच्या.
लहान शाळेत रोज १ पेन्सील लागायची. लिहून नाही काही संपायची,तर टोक करून संपायची.कायम टोकदार पेनसिलिनी लिहायचं असायचं ना. काय ओरडायची आई यावरून. नंतर त्या शिसे टाकायच्या पेन्सील बाजारात आल्या होत्या. त्या तर अगणिक  हरवल्या असतील. आमच्या वर्गात १ मुलगा चांगल्या घरातला होतं तरी पेन्सील,कंपास चोरायचा. एकदा त्याला पाळत ठेवून पकडला होतं नि इतका मारलं होतं कि दुसर्या दिवशी आईला शाळेतच बोलावलं होतं. चौथीतल्या मुलां कडून त्यांनी हे अपेक्षित केले नसेल. पण मज्जा आली होती त्याला मारायला. ४/५ मुलं त्याला व्हिलन समजून मारत होतो.
अशा छोट्या आठवणींवर किती तरी लिहिण्यासारखे आहे. बघू परत कधीतरी वाढवीन पोस्ट.

Read Full Post »


हा एक नवा प्रयत्न करतोय.

चालू केला आणि लक्ष्यात आले कि scaner नाही.मग कॅमेऱ्यांनी फोटो काढला. बघू पुढे लिहायला उत्साह उरतो का. कसे दिसतील फोटो माहित नाही. वाचातापण येईल की नाही माहित नाही. अपयश हीच यशाची पहिली [आणि माझीपण ] पायरी असते.

Part 1

PTO

part 2

PTO

part 3

Read Full Post »


काल दुपारची गोष्ट. त्यावेळी पुण्यातली वेळ रात्रीचे [पहाटेचे] १ वाजता.
मी आणि आमचा client अमेरिकेतून पुण्यातल्या सेंटरला फोन करून प्रोजेक्टबद्दल बोलत होतो.  काम महत्वाचे होते पण इतके नव्हते कि झालेच पाहिजे असे. पण खूप दिवसांपासून संपत नव्हते म्हणून तीन तिघाडा करून बसलो होतो.
अचानक कॉल चालू असताना तो मित्राला काय झालं काय माहित पण आम्हाला आवाज येवू लागले कि ओह्ह शिट, ओह्ह शिट आणि झटक्यात फोन कट झाला.
आम्हाला काही समजेनाच कि यानी असं अचानक काहीतरी होऊन फोन बंद का केला. आम्ही परत त्याच ठिकाणी फोन लावला तर कोणी उचलेना फोन. परत १ / २ वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. म्हणून मी सरळ त्याच्या मोबाईल वर फोन लावला. तर त्यानी तो उचलला.
तो धापा टाकत,पळत चालला होता कुठे तरी. फोन वर त्याला धड बोलता पण येईना. मला बोलला की १० मिनिटांनी फोन कर. काही सिरीयस नाहीये. मला कळेना कि झालं काय? हा असं का पळत असेल? सगळा ठीक तर असेल न तिकडे?

मी अगदी आतुरतेनी ती १० मिनिटे संपायची वाट बघत होतो. आणि एकदाची १० मिनिटे झाली मी परत मोबाईल वर फोन लावला. यावेळी तो जरा स्थिर स्थावर झाला होता.
नंतर त्यानी जे सांगितला ते ऐकून मी पोट धरून हसलो.आणि ऑफिसमधले पण सगळे हसत होते.

त्याचा असं झाला होता.
कॉल चालू होता तेव्हा मित्र पुण्यात संपूर्ण मजल्यावर एकटा होता. फक्त तो ज्या क्युबिकॅल मध्ये बसला होता तिथले १ / २  दिवे चालू होते आणि बाकी अंधारच होता. तर अचानक पणे कुठल्यातरी एका कुबिकॅल मधल्या दिव्यांची उघडझाप चालू झाली. ती थांबते न थांबते तोवर त्याला दिसणारे कॉम्पुटर चे monitors, flicker होऊ लागले.कधी हा monitor कधी तो. आणि त्यातच त्याला कोणीतरी पळत गेल्याचा आवाज आला. म्हणून त्याची पुंगी झाली टाईट. आणि तो काम बंद करून घरी पळत सुटला.
हे जेव्हा मला तो बोलला तेव्हा इतका हसलो कि बापरे. भित्रा ससाच आठवला मला.

मला पण कधी रात्री उशिरा थांबल्यावर वाटायचा कि कोणीतरी आहे तिथे वगैरे. त्या महेश कोठारेच्या सिनेमातली ती बाहुली वगैरे आठवायची.

Read Full Post »

Older Posts »