Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जुलै, 2009


सोनल एक मध्यम वर्गीय तरुणी. अत्यंत आकर्षक असे व्यक्तिमत्व. कमनीय बांधा, पाठीवर घोळणारे काळसर तपकिरी केस, सुरेख डोळे, धारदार नाक आणि हसली कि समोरचा घायाळ…. उंचीला साधारण ५ फुट ३ इंच पण कीर्तीला एकदम महान. सोनल १० वी आणि १२ वी दोन्ही वेळा बोर्डात आलेली होती. इंजिनीरिंग पण अव्वल श्रेणीत पास केले होते. आणि इतका सगळा असून सुध्धा माज काय असतो ते तिला ठावूक नाही. कोणीही ओळखीचा भेटला की त्याच्याशी ४ शब्द हसून बोलणार की समोरचा माणूस तिथेच आउट. पण सोनलला आधीपासूनच कोणीतरी आउट करून टाकले होते. राकेश! हो तिचा १२ वी पासूनचा जिवलग मित्र आणि तिचा बॉयफ्रेंड पण. राकेश सुध्धा सोनलसाठी अनुरूप असाच होता. ६ फुट किव्वा थोडासा जास्तच उंच, एकदम राजबिंडा. दोघांची जोडी म्हणजे मेड फॉर इच आदर. म्हणूनच कि काय सोनल ला फारशा मैत्रिणी पण नव्हत्या. जिवलग साथी जो होता.
दोघांना इंजिनीरिंग नंतर योगायोगानी एकाच मल्टी नेशनल कंपनी मध्ये नोकरी मिळाली होती. आणि दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

सोनल आणि राकेश यांचा मागच्याच वर्षी प्रेम विवाह झाला. पण त्यांना कंपनीच्या नियमानुसार लग्न झाल्यावर वेग वेगळ्या प्रोजेक्ट वर हलवण्यात आला. दोघेही एकदम खट्टू झाले होते. पण कंपनी पोलीसी पुढे काय करणार ना.

मे महिना संपत आला होता. सोनल च्या प्रोजेक्टची डेडलाईन समोर उभी होती. ऐन मे महिना म्हणजे लग्न सराईचे दिवस. त्यामुळे तिच्या प्रोजेक्ट मधले २ जण ऐन प्रोजेक्ट डिलिव्हरी च्या वेळी गायब होते. त्यामुळे जे लोक होते त्यांच्या वर सगळा बोजा आला होता. सोनल प्रोजेक्ट लीड करत होती आणि तिच्या हाताखाली ५ डेव्हलपर होते. कालच प्रोजेक्ट स्टेटस मिटिंग मध्ये टेस्टिंग टीम नि काही जुने पण क्रिटीकल बग्स अजूनही तसेच असल्यामुळे तीव्र नाराजी दर्शवली होती आणि हि गोष्ट वर पर्यंत गेली होती. त्यामुळे अकौंट मेनेजर आणि वरची बरीच मंडळी चिंताक्रांत होती. एक दोन बग्स तर जीवघेणे होते.  ते प्रोजेक्ट होतं अमेरिकेच्या एका बँकेच. त्या बगमध्ये प्रत्येक वेळी १ सेंट [ जवळ जवळ ५० पैसे ] बँकेच्या ग्राहकांना बँकेकडून जास्त जात होते. त्यामुळे बँक म्हणाली एकवेळ प्रोजेक्ट पूर्ण करू नका पण हे असे फुकटचे पैसे वाटणे बंद करा. सोनल आणि तिची टीम डोळ्यात तेल घालून प्रोब्लेम सोडवायचा प्रयत्न करत होते. पण तो बग काही केल्या राम म्हणायला तयार नव्हता. सोनलनी सगळ्या डेवलपर्सची एक अर्जंट मीटिंग बोलावली आणि म्हणाली ” guys  आता पाणी गळ्यापर्यंत आले आहे. हे प्रोजेक्ट तडीपार नेणे अत्यंत गरजेचे आहे. मला माहित आहे तुम्ही आज पर्यंत या प्रोजेक्ट वर किती कष्ट घेतले आहेत. अजून चारच दिवस मला हे जास्तीचे कष्ट तुमच्या कडून अजून हवे आहेत. मला तो दिवस दिसतोय कि जेव्हा आपल्या प्रेत्येकाला आपल्या कस्टमर कडून आणि ऑफिस मधल्या मेनेजर्स कडून अभिनंदनाच्या इमेल्स येत आहेत. आपण नुसते हे क्रिटिकल बग्स सोडवणार नाही आहोत तर संपूर्ण प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण करणार आहोत. तुमच्यात तेव्हढी क्षमता आहे हे मला माहित आहे.” मिटिंग मध्ये प्रत्येक जण सोनल काय बोलत्ये हे कान टवकारून ऐकत होते. त्यांना सुध्धा सोनल वर पूर्ण विश्वास होता. त्यांना सुध्धा पटले कि Yes We can do it and we will do it.

सोनल पुढे म्हणाली “चला तर मग कसे जात नाहीत ते बग्स बघतेच मी”. असं म्हणून तिने त्या महत्वाच्या १ सेंट बग सोडवायचा काम आपल्या हाती घेतलं आणि बाकी छोटी कामे पण पटापट वाटून टाकली. आता प्रत्येक जण युद्ध पातळीवर काम करू लागला.
गेले २ आठवडे सोनल घरी फक्त ५ तासान साथी जात होती. रात्री उशिरा राकेश तिला ऑफिसमध्ये घ्यायला यायचा. त्याला सुध्धा पूर्ण कल्पना होती कि तिची सध्या अवस्था काय आहे. सोनालच काय तिची सगळी टीमच घरी नावा पुरती जात होती. सर्वांच्या ध्यानी मनी एकाच ध्यास होता प्रोजेक्ट completion.

काल रात्री साधारण ८ वाजले असावेत. सगळे जण नुकतेच चहा बिडी मारून आले होते. सोनलने सुद्धा २ दाबेली पार्सल मागवल्या होत्या. सोनल तिच्या डेस्क वर तो १ सेंट बग घेवून बसली होती. विचार करत होती इथे कॉम्पुटर कोड तर सगळा बरोबर आहे मग घोडं अडतंय कुठे? काही केल्या तिला समजेना की नक्की होतंय काय. तिथल्या तिथे पहिला तर १ सेंटचा घोळ होत नव्हता. पण कस्टमर कडे का प्रोब्लेम येतोय?

कॉम्पुटर कडे ती अशी १ टक बघत बसली होती. आणि अननोइंगली उजव्या तर्जनीनी केसाच्या बटीशी खेळत होती. एकदम तंद्री लागली होती. मनोमन ती त्या बग ला विचारात होती कोण आहेस रे बाबा तू? कुठे लपला आहेस? तुझा नक्की प्रोब्लेम काय आहे? का आला आहेस? अजून कोण कोण आहेत तुझ्या बरोबर?
ती असा विचार करताच होती आणि तितक्यात काय झाला तिला पण कळले नाही.
असा एकदम एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत तिला दिसला आणि कोणीतरी तिला ओढत असल्याचा भास तिला झाला. ओढत ओढत तिला एखाद्या टनेल मधून गेल्या सारखा वाटलं. तिला कळेना की आपण नक्की आहोत कुठे? सगळा नव नव होतं तिथे. असं कधीच पहिला नव्हतं कुठे. मोठमोठ्या वायर होत्या, PCB चे बोर्डे होते. आणि तितक्यात तिला १ ओळखीचा भाग दिसला. तिला समजेना हे कुठे पाहिलंय. आणि जे तिला आठवल ते बघून ती खाली चक्कर येवून पडली.

तिचा मोबाईल वाजला म्हणून ती भानावर आली. राकेशचा फोन होता. तो विचारात होता कि आज किती वाजता घ्यायला येऊ तुला? पण सोनल काही बोलायच्या मनस्तिथित नव्हती. ती म्हणाली “राकेश तुला मी १० मिनिटां मध्ये परत फोन करते.”
तिनी आजूबाजूला पाहिल्यावर तिला असं समजले कि ती तिच्या कॉम्पुटरच्या मोनिटरच्या आत आली आहे. तिला अक्षरशः फिल्मी स्टाईल मध्ये मैं कहा हुं! मैं इधर कैसे आई? वगैरे झाले. तिनी स्वतःला चिमटा घेवून खात्री केली कि स्वप्नात तर नाहीये ना पण छे कसला काय खरा खुरा होता सगळं. रडू म्हणजे अगदी फुटायचे बाकी होते. तिला हजारो प्रश्न पडू लागले कि आता पुढे काय? बाहेर कशी जाणार? प्रोजेक्टचे कसे होणार? तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. कोणीतरी sms पाठवला होता. काहीच समजेना की नक्की होतंय  काय? तिनी राकेशला फोन लावला. आणि म्हणाली “हां राकेश काय करतोयस? बरं ऐक काय सांगत्ये ते.” तिला थांबवत तो म्हणाला “काही नाही कॉम्पुटर वर गेम खेळतोय. का गं काय झालं?” सोनल म्हणाली ” एक काम कर. असशील तसा लगेच ऑफिस मध्ये ये. मला थोडी मदत हवी आहे आणि तुझ्या शिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही. लगेच ये. आणि मला कॉल कर आलास की .”  राकेशला पण काही समजेना. पण एकदम रंगात आलेला गेम सोडून जाणे म्हणजे…. पण तो बोलला “ठीक आहे मी निघतो लगेच. सगळं व्यवस्थित आहे ना?” सोनल म्हणाली “हो रे. तू ये तर खरं.”
सोनलला कळत नव्हता कि जे घडतंय ते राकेश ला कसं सांगायचं? एकदम अघटीत जे होता.
सोनल पाहत होती ते तिच्याच अप्लिकेशनचा १ भाग होता. तेव्हढ्यात तिला कोणीतरी मागून हाक मारली.
“हाय सोनल !!!!!” तिनी पटकन मागे वळून पहिला तर असं १ लाल बॉल सारखं काहीतरी हवेत तरंगत होतं. तिनी घाबरून विचारला “कोण आहेस तू?” जाम फाटली होती सोनलची. दरदरून घाम फुटला होता. एका हातात मोबाईल घट्ट पकडून दुसऱ्या हातानी ती ओढणीच्या टोकाला घाम पुसत होती. पोटात भीतीनी गोळे तयार झाले होते. छातीत धडधडत होतं. हात पाय थंडगार पडले होते.
परत एक दीर्घ श्वास घेवून, आवंढा गिळत तिने विचारलं ” ए कोण कोण आहेस तू?”
तो लाल बॉल बोलला “मी तुझ्या अप्लिकेशन मधला एक बग आहे.”
सोनल म्हणाली “काय? कोण आहेस तू? बग?”
ती मनात म्हणाली असं कसं होऊ शकेल? बग वगैरे असं बोलतात का कधी? पण जे घडतंय त्याकडे पाहून काहीही घडू शकतं हे तिला पटले. अगदी क्षणभर तिला नुकत्याच पाहिलेल्या Harry Potter सिनेमामधलं पण खरं तसं होत असेल असं वाटून गेलं.
ती त्या बॉल रुपी बग ला म्हणाली मी इथे कशी आले? कोणी आणला मला इथे?
तो बग अगदी शांतपणे म्हणाला “सोनल घाबरू नकोस. तुला आमच्यापासून कोणताही धोका नाहीये. आम्ही तुला मदत करण्यासाठीच इथे असं अचानक आणलं आहे. आम्ही तुला तुझ्या अप्लिकेशन मधले बग्स म्हणजे माझे भाऊबंद याचा नायनाट करण्यासाठी घेवून आलो आहोत .”
सोनलच्या मनात विचार चक्र परत फिरू लागली. तिला वाटलं यांच्यात काही भांडणं तर झाली नाहीत ना? कि शत्रू चा शत्रू तोच माझा मित्र, कोणत्या तरी बगचा काटा काढायचा वगैरे असेल. आता काय बोलावं मी याला.
ती गप्प बसलेली पाहून तो पुन्हा बोलला “यात माझा किव्वा आमचा कोणताही वाईट उद्देश नाहीये. आत्ता असलेले क्रिटीकल बग्स हे असे सहजासहजी  जाणार नव्हते म्हणून हा सारा खटाटोप.”
ती म्हणाली ” आर यु किडिंग?”
बग बोलला “मी ओळख करून देतो. मी C2. मी अश्या अश्या मोड्युल मधला बग आहे. सर्वात क्रिटीकल बग तो १ सेंटचा फरक पडणारा तिकडे आहे. त्याचा नाव C1.”
सोनल म्हणाली “माय गुडनेस, शिट. कुठाय तो C1?”
बग बोलला “चल आपण जाऊ तिथे” आणि ती त्या तरंगणाऱ्या बग च्या मागोमाग चालू लागली. आजूबाजूला तिला असं सगळं स्वप्नवत दिसत होतं. तिने तिची जीमेलची मेलबॉक्स हात लावून पहिली. गच्च भरली होती.
तिकडे जाऊन पाहते तर काय या बग सारखे अजून कितीतरी बग्स तिथे हजर होते.
ती त्या C2 ला घाबरत घाबरत म्हणाली, “हे बग्स कोण आहेत? माझ्याच अप्लिकेशन मधले आहेत कि काय? देवा !!!!”
तो म्हणाला “हो पण घाबरू नकोस हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत. एक बग निघाला कि अजून २/४ सहज निघून जातील.”
तेव्हढ्यात राकेश तिच्या डेस्क पाशी पोचला आणि तिने इतक्या घाईघाईनी बोलावून ती स्वतः मात्र गायब होती. म्हणून त्याने तिला फोन लावला.
सोनल चा फोन वाजला. पाहते तर राकेश कॉलिंग …..
तिनी लगेच फोन रिसीव्ह केला आणि म्हणाली “काय रे किती वेळ लावलास पोचायला? कधी पासून वाट बघत्ये.”
तो म्हणाला मी गेली १० मिनिटे तुला तुझ्या डेस्क च्या आसपास शोधतोय. कुठे आहेस कुठे तू?
मग तिने त्याला सगळं सांगायला सुरवात केली. तो म्हणाला काय? सोनल दारू तर नाही प्यायालीस तू? वेडी झाली आहेस कि काय? मी खेळत असलेला गेम अर्धवट सोडून हि असली मजा ऐकायला नाही आलो. जिथे असशील तिथून लौकर ये मी तुझ्या डेस्क पाशी तुझी वाट बघतोय. ये लौकर. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
सोनल नि परत त्याला फोन लावला. आणि म्हणाली अरे मी खरं बोलत आहे. असं म्हणून बोलता बोलता ती त्या मोनिटर च्या स्क्रीन पाशी गेली आणि म्हणाली कि मला तू स्पष्ट दिसत आहेस. जीन्स आणि ब्लू टी-शर्ट मध्ये आला आहेस आणि आत्ता त्या टेबलवर बसून खुर्ची पायांनी हलवताना दिसतोयस. हो की नाही सांग?
तो बोलला खरं सांग सोनल कुठे आहेस तू? टेबल खाली वगैरे तर नाही लपलीस ना? आता मजा बास झाली बरका.
सोनल म्हणाली अरे मी खरच मजा नाही करत आहे. मला तू दिसतोयस पण तुला मी नाही दिसणार. असं म्हणून त्याला तिने तिच्या डेस्क जवळ बोलावलं आणि म्हणाली खुर्चीत बस आणि मी सांगते सगळं नीट लक्ष्यपूर्वक ऐक.
असं म्हणून ती त्याला सगळा इत्यंभूत वृतांत सांगू लागली. त्याला ते सगळं परीकथे सारखं वाटत होत पण विश्वास ठेवण्यावाचून काही पर्याय नव्हता. ती म्हणाली परत फोन करते १० मिनिटांमध्ये आणि फोन संपवला.
आता ती परत त्या C2 शी बोलू लागली “C2 मला सांग हा १ सेंटच्या प्रोब्लेम ची काय भानगड आहे. कसा सोडवायचा तो प्रोब्लेम? सुटण्यातला आहे का? नसेल तर काही तात्पुरता उपाय आहे का? कोणाच्या चुकीने तो प्रोब्लेम आला आहे?”
C2 म्हणाला “थांब थांब थोडा दम धर. हा C1 प्रोब्लेम पूर्ण जाऊ शकतो . मी तुला सांगतो तो कसा आला. ”
मग तो सांगू लागला की मागच्या डीलीव्हारीच्या वेळी १ अर्जंट फीक्स करायच्या वेळी संकेतच्या हातून चुकून का प्रोब्लेम घडून आला. पण जसजसं प्रोजेक्ट वाढत गेलं तशी त्याची व्याप्ती वाढत गेली. त्यावेळी याकडे कोणाचे लक्ष्य गेले नव्हते. पण मी जसं सांगतो तसं जर तू केलास तर तो जाईल.” असं म्हणून त्यांनी तिला तो प्रोब्लेम चे मूळ कुठे आहे ते सांगितले .
तिने लगेच राकेश ला फोन लावून कोणती तरी फाईल ओपेन करून सांगितला कि ह्या ह्या ठिकाणी हे हे असं चेंज कर. राकेश ला काहीही कळत नव्हत.पण तो ती सांगेल तसं करत गेला. तेवढ्यात तिथे तो संकेत येवून पोचला. राकेश नि त्याच्या मदतीनी अजून थोडे बदल केले. संकेत नि विचारला “राकेश सोनल कुठून बोलत्ये फोन वर? इथे येणारे का आज? मला १ प्रोब्लेम आला आहे. १ नवा बग आला आहे असं आत्ता टेस्टिंग टीम कडून मेल आलंय”  हे ऐकून तो खुश झाला आणि सोनल ला म्हणाला कि अजून १ बग आलाय असं संकेत म्हणतोय. संकेत म्हणाला “बग आलाय तर हा का खुश का झालाय? च्यायला.याच्या”
तिकडे सोनल त्याला म्हणाली “या संकेतच्याना नानाची टांग. आले की बघतेच त्याच्याकडे. ” असं म्हणत म्हणत तिने तो नुकताच  आलेला बग पण चुटकी सरशी सोडवला. आता जर बगच सांगत असेल कि तो कसा जाईल तर किती पण बग्स असोत ना..
फोन वर बोलता बोलता सहज तिच लक्ष्य त्या दूर बसलेल्या C1 बग कडे गेलं. पाहते तर काय? त्या C1 बग चा रंग लाल चा पालटून हिरवा झाला होता. ती C2 ला म्हणाली ” त्या C1 चा रंग असा लाल चा हिरवा का झालाय?”
C2 म्हणाला  “अगं तो बग आता सुटलाय. देअर ईज नो मोर C1 बग ईन युअर अप्लिकेशन.”
सोनल म्हणाली “काय सांगतोस काय?” सोनलला इतका हलकं फुलकं वाटत होतं. पण मध्येच शंकेची पाल पण चुकचुकत होती. खरच गेला असेल ना? म्हणून तिनी फोन करून राकेश बरोबर संकेत ला सांगून चेक करायला सांगितला तर आश्चर्य तो बग नामशेष झाला होता.
सोनलला आता लाल बॉल्स पैकी बरेच बॉल्स हिरवे झालेले दिसत होते. इतकाच नाही ज्या C2 शी बोलत होती तो पण हिरवा झाला होता. आणि जवळ जवळ सगळे बग्स संपले होते. तिनी एक सुटकेचा निश्वास घेतला आणि गेल्या २ तासांचा मागोवा घेवू लागली. C2 अजून तिच्या शेजारीच होता. तिची आता परत जायची वेळ आली होती. तिनी त्या सगळ्या बग्स ला आणि स्पेशली C1 आणि C2  म्हणाली “आज संध्याकाळ पर्यंत मी तुम्हाला शत्रू समजत होते पण तुम्ही सगळे तर मित्र निघालात. मी तुम्हा सर्वांची अत्यंत आभारी आहे. आज केवळ तुमच्या मदतीमुळे मी हे सर्व दिव्य पार पडू शकले. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहणार आहे. पण मला आल्यापासून एक प्रश्न सतावतो आहे. आणि तो म्हणजे कि तुम्ही मला मदत करायची का ठरवलंत? तस म्हणाल तर तुमचा आणि माझा काय संबंध?”
यावर C2 म्हणाला “खरं तर तुझ्या प्रोजेक्ट मध्ये कुठलाही बग कधीच नसतो. पण कधीतरी कोणाच्यातरी चुकीमुळे असं होऊ शकतं पण तुझी कर्तव्य तत्परता, कामावरील निष्ठा बघून आम्ही तुला मदत करायचा निर्णय घेतला. आता या पुढील कोणत्याही प्रोजेक्ट मध्ये कधीही कोणताही बग मग तो कितीही क्रिटीकल असो आम्ही तुला तो सोडवायला मदत करू.”
सोनलला काय बोलावे समजेना. तिने मोबाईल मध्ये पहिले तर साडे अकरा वाजून गेले होते. तिला इकडे येवून बराच वेळ झाला होता. तिने त्यांना परत विचारले “पण आता मी बाहेर कशी जाऊ? आणि तुम्ही सगळे आता कुठे जाणार?”
C2 बोलला “बाहेर जायची काळजी तू करू नकोस एका सेकंदात तू बाहेर पोचशील. आणि आमचा काय आहे गं आत्ता होतो आत्ता नाही. कधी या अप्लिकेशन मध्ये तर कधी त्या. आमचा असं एक ठिकाण नसतो. ना आमच स्वरूप, ना काहीच स्थायी नसतं”
सोनलला कळेना त्यांना कसे म्हणावे कि परत भेटू? तिने परत त्यांचे आभार मानले आणि म्हणाली “मला तुम्हा हिरव्या बग्स ला परत भेटायला नक्कीच आवडेल. आणि खरच तुम्ही मला आयुष्यभर बग्स सोडवायला मदत करणार आहात?” तिचा खरच विश्वास बसत नव्हता.
सोनल नि फोन करून राकेश ला सांगितला कि ती निघाली आहे. आणि तिने सर्वांचा निरोप घेतला आणि टेक ऑफ साठी तयार झाली. निघताना तिची C2 शी नजरानजर झाली. सोनलच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होता. तिने C2 ला हात वेव्ह करून बाय केलं.
परत तिला तो दिव्य प्रकाशाचा झोत दिसला आणि एखाद्या टनेल मधून जातोय असं जाणवले . दुसऱ्या सेकंदाला ती तिच्या डेस्क पाशी होती. ती अशी अचानक आलेली पाहून राकेश पण घोटाळला. पण मग त्याची खात्री पटली. बर झाला राकेश नि संकेत ला २ मिनिटां पूर्वी तिथून पिटाळला होता. नाहीतर ते गुपित नसतं राहिल. तिने राकेश सांगितला कि सगळे बग्स सुटले आहेत आणि आता ते प्रोजेक्ट यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे. दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. ती मनोमन त्या बग्स ला धन्यवाद देत होती आणि राकेश ला म्हणाली “बघ माझे बग मित्र” राकेश गोड हसला आणि दोघेही घरी जाण्यासाठी निघाले.
यथावकाश ते प्रोजेक्ट पूर्ण झालं. सगळी कडे सोनलचे गुण गायले जात होते. पण सोनल? सोनल त्या बग मित्र मंडळींचे गुणगान गात होती.

Read Full Post »