Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for सप्टेंबर, 2009

अमेरिकेत बेबी बूम


या नावावरूनच सगळं काय आहे ते कळून येते. हा परिणाम आहे सध्याच्या रिसेशनचा. काल हा IBN च्या साईट वरचा न्यूज वीडीओ पाहिला आणि गम्मत वाटली. अमेरिकेत IBN नुसार रिसेशनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना घरी मनसोक्त वेळ मिळू लागला आणि मग काय आली बेबी बूम. सगळी नर्सिंग होम्स म्हणे भरली आहेत. माहीत नाही की हे असं खरच घडलंय की टाईम पास न्यूज आहे…

हि असली बेबी बूम वगैरे अमेरिकेत ठीक आहे. यांना लोकसंख्या वाढीचा प्रश्न नाहीये. त्यांना नोकरी गेली तरी काही दिवस सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळत राहतो. असाच मनात विचार आला कि आपल्याकडे अशी परिस्थिती आली तर….. आपल्याकडे असं होणार नाही आपले लोक सुज्ञ आहेत, त्यांना परिस्तिथीची जाणीव आहे. त्यामुळे अशी बूम येऊ देणार नाहीत.

Read Full Post »