Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जानेवारी, 2010


अमेरिकेत नुकताच सुपर डुपर शॉपिंगचा हंगाम संपला. २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात अमेरिकेत ऑनलाइन आणि दुकानात मिळून प्रचंड उलाढाल होते. सर्व गोष्टींवर अक्षरशः भरघोस सूट दिलेली असते. म्हणून बरेच लोक गरज नसताना सुद्धा खरेदी करतात. या मुळेच दुकानदारांचे चांगलेच फावते. सगळी कडे क्लिअरन्स सेल लावतात आणि दुकान आणि ओघाने ग्राहकाचे खिसे रिकामे करून घेतात. सगळी कडे नुसती मजा चालू असते. दुकाने पहाटे २ ला, ४ ला उघडतात आणि ८०% सूट वगैरे देतात मग काय लोक २ / २ दिवस आधी दुकानाबाहेर रंग लावून बसतात. तिथेच तंबू ठोकून राहतात.
असो थोडं विषयांतर झाले.
बाकी देशांमध्ये रिटर्न पॉलीसी कशी असते ते माहित नाही. पण भारतात सोडून सगळी कडे ती चांगली राबवली जात असणार. आता रिटर्न पॉलीसी म्हणजे थोडक्यात काय तर तुम्ही दुकानातून काहीतरी विकत घेता आणि ते आवडला नाही अथवा खराब झालं तर तुम्ही ते अगदी सहज परत देवू शकता आणि पैसे परत मिळवू शकता. तुम्हाला कोणी विचारात नाही कि तुम्ही का परत करत आहात. ही रिटर्न पॉलीसी अगदी १ डॉलरच्या वस्तू पासून ते अगदी १००० डॉलर च्या LCD TV पर्यंत काहीही परत करू शकता. आता याला सुध्धा लिमिट असते कि ३ महिन्यांच्या आत ती गोष्ट परत केली पाहिजे आणि पावती पाहिजे ईत्यादी ……
हे दुकानदार मग असली रिटर्न आलेली उपकरणे वगैरे परत किंमत कमी करून used म्हणून सेल लावतात.
आता हा झाला या इकॉनॉमीचा भाग की ते लोक, लोकांना कहीही करून विकत घ्यायला भाग पडतात. पण खूप कमी लोक असं उगाचच परत करत असतील. पण या गोष्टीचा अमेरिकेतले बरेचसे भारतीय अथवा देसी लोक गैरफायदा घेताना दिसतात. मी अनेक लोकांना असं करताना पाहिलं आहे. आता ते करतात काय तर समजा एखाद्या दुकानात TV चा सेल चालला असेल तर ते तो TV विकत घेतात २.५ महिने वापरतात आणि नंतर सरळ जाऊन दुकानात परत करतात कि आवडला नाही. माझ्या मित्राचा बॉस असं करतो नेहमी. आता तो बॉस सुद्धा अमेरिकेत चांगला ५ / ६ वर्ष राहिला आहे तरी…
काही जणांचं ऐकला होता कि ट्रीपला तर जायचय पण फोटो काढायला कॅमेरा नाही तर काय दुकानातून कॅमेरा घ्यायचा ट्रीप पुरता वापरायचा आणि आल्यावर परत करायचा. सो सिम्पल…
आता अमेरिकेत येवून असला देसीपणा दाखवायलाच पाहिजे का? आपणच आपल्याला बदनाम करत आहोत असं त्यांना नाही का वाटत? भारतात स्वप्नात तरी होईल का कोणत्या दुकानाची असली रिटर्न पॉलीसी ठेवायची हिम्मत. तसं म्हणाला तर कोपऱ्यावरच्या वाण्याकडे थोडीशी रिटर्न पॉलीसी चालू असते. पण ते तेवढ्या पुरतेच………..

Read Full Post »