Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘ऑफिस’ Category


समजा ऑफिसमध्ये तुम्ही क्युबिकलमध्ये बसून काम करत आहात आणि अचानक पलीकडच्या क्युबिकल मधून कॉफी पिण्याचा जोरदार भुर्रूक भुर्रूक आवाज आला तर? ती कॉफी सुध्धा एकदम घट्ट दुधाची असावी, लापशी सारखी, फेस असलेली. मधूनच कपमध्ये चमच्यानी कॉफी ढवळण्याचा कडडम कडडम आवाज आला तर? आणि तो कडडम आवाज कॉफी संपेपर्यंत येत राहिला तर? सोबत बिस्कीट खाताना तोंडात डिंकाचे हजारो झरे फुटल्यामुळे येणारा पचाक पचाक आवाज येत असला तर??

भुर्रूक पचाक पचाक.. ऐकून अंगावर शिसारी आली. म्हणालो नक्की कोणीतरी देसी असणारे. कारण अमेरिकेत हे असलं वर्तन आपण एखाद्या देसीकडूनच अपेक्षित करतो.
उठून उभा राहिलो आणि बघितल तर काय? समोर साक्षात १ देसी संगणाकाकडे बघत तल्लीन होऊन चमचा त्या कपातल्या कॉफीत गरागरा फिरवत होता. नाव गाव समजल्यावर कळले कि तो १ NRI मराठी तमिळ आहे. म्हणाला कालच रुजू झालोय. काल तू सुट्टीवर होतास म्हणून भेट नाही झाली आपली.म्हणाला मी मद्रासी आहे पण जन्मापासून मुंबईकर असल्यामुळे तमिळ कमी आणि मराठी जास्ती येतं मला. मी बरं म्हणालो. मग त्यांनी कोणत्या प्रोजेक्ट साठी आलाय वगैरे सांगितलं.

त्या दिवशी त्याने जेवणाचा डबा आणला नव्हता म्हणून मी वाचलो नाहीतर दुसऱ्या दिवसापासून त्याने चळचळत्या लसून फोडणीच्या वासाचे, तर्रीवाले डबे उघडायला सुरवात केली. त्याचं खाऊन झाल्यावर १ तासभर आसमंतात तो वास दरवळत असायचा. मग मी एकदा त्याच्या बॉसला माझ्या क्युबिकल मध्ये कामानिमित्त बोलावले होते. तो आल्या आल्या म्हणाला वास कसला येतोय? मी पलीकडून असं बोट दाखवले. म्हणून त्याने डोकावून पहिले तर त्याला तिथे विश्वरूप दर्शन झाले. माझं न बोलताच काम झाले. मग यथावकाश त्याने त्याला सांगितले आणि ते वासू डबे बंद झाले.

तरीपण भुर्रूक पचाक पचाक चालूच होते. असाच एकदा तो तल्लीन होऊन कडडम कडडम करत असताना मी म्हणालो चमचा पण विरघळेल रे!! हळू ढवळ जरा. मग जरा आवाज कमी झाला.

मी विचार केला कि हा माणूस गेली ४ वर्ष अमेरिकेत असाच वागत आलाय कि काय? अवघड आहे याचे. घरी तू कसा पण का वाग ना. कोण काय म्हणणारे तुला.

मी असे म्हणत नाही कि मी एटिकेट्स चे पुस्तक कोळून प्यायलोय वगैरे पण कमीत कमी बघावे आपण कुठे आहोत, आजूबाजूचे लोक कसे वागत आहेत आणि आपण कसे वागतोय, आपण इथे काय करतोय?

अमेरिकेसाठी निघताना पुण्यात HR नी एक एटिकेट्सचा कोर्स करायला लावला होता. त्यात सगळं शिकवल होतं चारचौघात कसे खायचे, काटा चमच्यानी कसं खायचं, आवाज न करता कसं खायचं ई ई.

मला वाटतंय कि एकतर याने तो कोर्स नक्की बंक केला असणार किंवा त्या शिकवणाऱ्या मास्तरला तरी सगळं विसरायला भाग पाडलं असणार.

Read Full Post »


स्टेफी माझ्या सोबत ऑफिस मध्ये काम करते. सगळ्यांच्यात ती खूप सही आणि मनमिळावू म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याचे झाले असे काल तिचा वाढदिवस होता, त्यामुळे स्वारी मस्त नटून थाटून आली होती. अधिक म्हणायचं तर एकदम कडक मध्ये आली होती. येताना तिनी आमच्या सर्वांसाठी खूप प्रकारचे केक आणले होते. सोबत चोक्लेट्स पण होती. शिवाय डोनट पण होते रंगीबिरंगी icing मध्ये लपलेले. मग सर्वांना तिनी बोलावून आस्वाद घेण्यास सांगितले. आता मी जर पुण्यातल्या ऑफिस मध्ये असतो तर हा सगळा माल मसाला काही मिली सेकंद मध्ये गट्टम झाला असता पण इथे सगळे हळू हळू, sofasticated अवतारात तिला शुभेच्छा देवून खाऊ खात होते. बर ही खाद्य यात्रा बास झाली. महत्वाचे तर पुढे आहे.

तर सगळे तिच्या डेस्क भोवती होते एवढ्यात २ सहकारी १ भलामोठा पुष्पगुच्छ घेवून आले. तिनी तो स्वीकारला आणि त्यावरीन संदेश वाचला तर त्यात लिहिला होता from Love. सर्वांना वाटले असेल नवर्यानी पाठवलेला. १० मिनिटे होतात तोवर ६ फुट उंच ग्रीटिंग कार्ड आले. परत ते from Love. ती लाजून लालेलाल झाली होती. अजून ५ मिनिटांमध्ये १ मोठठा चोक्लेट्स चा box आला तो पण Love कडून. जरी अति होत होते. आणि तितक्यात साक्षात तो तिचा Love का कोण आला. मग दोघांचे हस्तालोन्दन झाले. अमेरिकी तर्हेने ग्रीटिंग झाले. म्हणालं चला आता कामाला लागुया. इतक्यात एक मित्र बोलला अरे हा तर तिचा नवरा नाहीये. मी म्हणालो काय? म्हणालो गप तुला काय माहित? तर तो बोलला कि तो मागच्या वर्षी तिच्या घरी पार्टी ला गेला होता तेव्हा भेट झाली होती.

मग आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला. म्हणल असेल बाबा काहीतर गम्मत दोघांची.आपल्याला काय करायचय असेनात का. पण मला राहून राहून वाटत होते या वयात? म्हणजे आज स्टेफी चा ५२ वा वाढदिवस होता. आणि हा जो कोणी Love  होता तो तिचा बॉयफ्रेंड होता. म्हणलं अरेय वाह मज्जा आहे.

आपल्याला पुण्या मुंबईत काय भारतात पण असा पहायची सवय नाही म्हणून मला जरा अप्रूप वाटलं बाकी काही नाही.

Read Full Post »