Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Posts Tagged ‘office ghost’


काल दुपारची गोष्ट. त्यावेळी पुण्यातली वेळ रात्रीचे [पहाटेचे] १ वाजता.
मी आणि आमचा client अमेरिकेतून पुण्यातल्या सेंटरला फोन करून प्रोजेक्टबद्दल बोलत होतो.  काम महत्वाचे होते पण इतके नव्हते कि झालेच पाहिजे असे. पण खूप दिवसांपासून संपत नव्हते म्हणून तीन तिघाडा करून बसलो होतो.
अचानक कॉल चालू असताना तो मित्राला काय झालं काय माहित पण आम्हाला आवाज येवू लागले कि ओह्ह शिट, ओह्ह शिट आणि झटक्यात फोन कट झाला.
आम्हाला काही समजेनाच कि यानी असं अचानक काहीतरी होऊन फोन बंद का केला. आम्ही परत त्याच ठिकाणी फोन लावला तर कोणी उचलेना फोन. परत १ / २ वेळा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. म्हणून मी सरळ त्याच्या मोबाईल वर फोन लावला. तर त्यानी तो उचलला.
तो धापा टाकत,पळत चालला होता कुठे तरी. फोन वर त्याला धड बोलता पण येईना. मला बोलला की १० मिनिटांनी फोन कर. काही सिरीयस नाहीये. मला कळेना कि झालं काय? हा असं का पळत असेल? सगळा ठीक तर असेल न तिकडे?

मी अगदी आतुरतेनी ती १० मिनिटे संपायची वाट बघत होतो. आणि एकदाची १० मिनिटे झाली मी परत मोबाईल वर फोन लावला. यावेळी तो जरा स्थिर स्थावर झाला होता.
नंतर त्यानी जे सांगितला ते ऐकून मी पोट धरून हसलो.आणि ऑफिसमधले पण सगळे हसत होते.

त्याचा असं झाला होता.
कॉल चालू होता तेव्हा मित्र पुण्यात संपूर्ण मजल्यावर एकटा होता. फक्त तो ज्या क्युबिकॅल मध्ये बसला होता तिथले १ / २  दिवे चालू होते आणि बाकी अंधारच होता. तर अचानक पणे कुठल्यातरी एका कुबिकॅल मधल्या दिव्यांची उघडझाप चालू झाली. ती थांबते न थांबते तोवर त्याला दिसणारे कॉम्पुटर चे monitors, flicker होऊ लागले.कधी हा monitor कधी तो. आणि त्यातच त्याला कोणीतरी पळत गेल्याचा आवाज आला. म्हणून त्याची पुंगी झाली टाईट. आणि तो काम बंद करून घरी पळत सुटला.
हे जेव्हा मला तो बोलला तेव्हा इतका हसलो कि बापरे. भित्रा ससाच आठवला मला.

मला पण कधी रात्री उशिरा थांबल्यावर वाटायचा कि कोणीतरी आहे तिथे वगैरे. त्या महेश कोठारेच्या सिनेमातली ती बाहुली वगैरे आठवायची.

Read Full Post »