Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2010


कोणत्याच टीमने पाकिस्तानी खेळाडूंसाठी बोली लावली नाही आणि त्यामुळे सध्या बराच वादंग उठला आहे. याबाबत ज्या काही लोकांची मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतांशी लोकांनी जे झाला ते अतिशय चांगलं झालं अशी टिप्पणी केली. मला सुध्धा  खूप बरे वाटले, मनाला शांती लाभली. काही लोक म्हणत होते हे झालं ते चुकीचे आहे. खेळामध्ये राजकारण आणणे बरोबर नाही. तुम्ही लोक खेळाचा आनंद लुटा, आणि आपापसातील वैर बाजूला ठेवा…. किती सोपा आहे न असा म्हणणं?

IPL वाल्यांनी कोणत्या का कारणांनी पाकिस्तानी खेळाडूंना घेतला नाही तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी ते लोक धंदा करायला बसलेत. मी म्हणेन त्या खेळाडूं मार्फत चांगली अद्दल घडली आहे पाकिस्तानला. आपण हर तर्ह्रेने त्यांचा त्रास सहन करायचा आणि आपण आपसी भाईचाऱ्या अंतर्गत त्यांच्या खेळाडूंना, गायकांना डोक्यावर बसवून ठेवायचं. त्या लोकांकडे आपल्या सारखी चित्रसृष्टी  नाही म्हणून आपले चित्रपट तिकडे चवीने पहिले जातात. वाघाला वाघ म्हणा अथवा वाघोबा म्हणा त्याला काही फरक पडणारे का?

मी तर तो कोण तो आतिफ अस्लम, अदनान सामी यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांची साधी गाणी सुध्धा न गुणगुणायचा विचार करतोय…..

Read Full Post »